पिंपरी : कोरोनाचे आढळले 38 नवे रुग्ण | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे आढळले 38 नवे रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे बुधवारी दिवसभरात 38 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 198 सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. कोरोनावर उपचार सुरू असलेले 37 रुग्ण दिवसभरात बरे झाले. तर, 197 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली.
शहरात आजअखेर एकूण 3 लाख 71 हजार 944 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 67 हजार 848 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 629 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Back to top button