पिंपरी : कोरोनाचे दिवसभरात 49 बाधित रुग्ण | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे दिवसभरात 49 बाधित रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे शनिवारी दिवसभरात 49 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 40 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 7 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 172 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे. 455 संशयित रुग्णांची दिवसभरात कोरोना चाचणी करण्यात आली.

शहरात आजअखेर एकूण 3 लाख 71 हजार 824 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 67 हजार 747 रुग्ण बरे झाले आहे. तर, 4 हजार 629 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Back to top button