पुणे: चतुर्थीनिमित्त एसटीच्या अष्टविनायक दर्शन फेर्‍या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: 13 तारखेला येणार्‍या चतुर्थीनिमित्त एसटी प्रशासनाने अष्टविनायक दर्शन फेर्‍या सुरू केल्या आहेत. एसटीच्या शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून या गाड्या प्रवाशांना चतुर्थीच्या दिवशी (दि. 13) उपलब्ध होतील, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शन बस गुरूवार (दि.13) रोजी सकाळी 7 वाजता तर पिंपरी चिंचवड आगारातून सकाळी 7 वाजताच सुटणार आहे. या फेर्‍यांसाठी प्रवाशांना आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीचे प्रौढ आणि मुलांकरिता भाडेदर वेगवेगळे असणार असून, पौढांसाठी 990 रूपये ते 1005 रूपये तर मुलांसाठी 500 ते 505 रूपयांपर्यंत भाडे दर असतील. अष्टविनायक दर्शनसाठी ओझर (भक्त निवास ) येथे राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली असुन, तो खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे अवाहन एसटीचे पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Exit mobile version