जुन्नर: तरुणाला वाचविण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले, कुकडी नदीपात्रातील प्रकार | पुढारी

जुन्नर: तरुणाला वाचविण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले, कुकडी नदीपात्रातील प्रकार

खोडद, पुढारी वृत्तसेवा: बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शनिवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास कुकडी नदीपात्रात बुडत असलेल्या एका युवकाला वाचविण्यात यश आले. परंतु वाचविण्यासाठी गेलेले दोन्ही युवक नदीपात्रात गायब झाल्याची घटना घडली आहे.

बोरी बुद्रुक येथील कुकडी नदीपात्रात स्मशानभूमीजवळ पोहण्यासाठी गेलेला अनिल संदीप धुळे (वय १७) हा मुलगा पाण्यात बुडत होता. त्यामुळे जवळच असणारे अमोल संदीप धुळे (वय १९) व बापू आनंदा धुळे (वय ३५) यांनी पाण्यात उडी घेऊन अनिल याला वाचविण्याचे प्रयत्न केले. यात त्यांना यशही आले. परंतु वाचविण्यासाठी उतरलेल्या अमोल धुळे याला दम लागल्याचे निदर्शनास आल्याने बापू धुळे पुन्हा माघारी अमोल धुळे यास वाचविण्यासाठी गेले. परंतु ते दोघेही बाहेर न येता नदीपात्रात गायब झाले असल्याने दोघांचाही शोध सुरू आहे. घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Back to top button