पिंपरी : कंपनीतून 14 लाखांचे पार्ट चोरीला

crime
crime
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे येथील बीएमडी इंजिनिअरिंग या कंपनीतून चोरट्यांनी 14 लाख चार हजार 500 रुपयांचे जॉब पार्ट चोरून नेले. ही घटना 20 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. गोकुळ ज्ञानेश्वर भिसे (29, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कंपनी सोमवारी (दि. 19) रात्री पावणेनऊ ते मंगळवारी (दि. 20) सकाळी साडेआठ या कालावधीत बंद होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील बाजूला असलेल्या उघड्या पत्र्याच्या  शेडमधून 14 लाख चार हजार 500 रुपये किमतीचे 107 जॉब पार्ट चोरून नेले. महाळुंगे पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps.

Stay updated with the latest news at your fingertips.

Android

iOS

Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news