पुणे : हॉटेलची थाळी ऑनलाइन मागविणे पडले महागात, दोन घटनांत पावणेचार लाख रुपयांचा आर्थिक गंडा | पुढारी

पुणे : हॉटेलची थाळी ऑनलाइन मागविणे पडले महागात, दोन घटनांत पावणेचार लाख रुपयांचा आर्थिक गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  हॉटेलची थाळी ऑनलाइन ऑर्डर करणे दोघाींंना चांगलेच महागात पडलेे. थाळी तर घरी आलीच नाही; मात्र त्या बदल्यात 4 लाख 86 हजार रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ आली. याप्रकरणी कोरेगाव पार्क व येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.  फेसबुकवर जाहिरात पाहून एक नामांकित हॉटेलमधून ऑनलाइन ऑर्डर करण्याचा प्रयत्न एका महिलेच्या अंगलट आला. सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 1 लाख 52 हजार 321 रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील 39 वर्षांच्या नागरिकाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट रोजी घडला होता.

फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुकवर थाळीची जाहिरात पाहून त्यावरील मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा चोरट्याने त्यांना झोहो नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये त्याने क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाईलचा ताबा चोरट्याने घेऊन त्यांच्या खात्यातून 1 लाख 52 हजार 321 रुपये काढून घेतलेे. दुसरा प्रकार येरवडा परिसरात घडला आहे. आयटी कंपनीत काम करणार्‍या एका व्यक्तीला नामांकित हॉटेलची थाळी घरपोच देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी 3 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत 44 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादींना फेसबुकवर ऑनलाइन थाळीची जाहिरात दिसली होती. त्यानुसार त्यांनी संपर्क केला. त्यानंतर चोरट्याने त्यांना आपल्या जाळ्यात खेचून अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याद्वारे फिर्यादीच्या बँक खात्याचा ताबा घेऊन पैसे काढून घेतले.

बनावट जाहिरातींना बळी पडू नका!
गेल्या काही दिवसांपासून सायबर पोलिस ठाण्यात अशा अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यानंतर पोलिसांनी संबंधित डायनिंग हॉलला सूचना देऊन तसे आवाहन सोशल मीडियावर करण्यास सांगितले. त्यानंतरही अशा बनावट जाहिराती अजूनही दिसून येत आहेत. नागरिकांनी अशा जाहिरातींना भुलून न जाता त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत

Back to top button