पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब; सुप्रीम कोर्टाने विरोधातील याचिका फेटाळली | पुढारी

पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब; सुप्रीम कोर्टाने विरोधातील याचिका फेटाळली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 2019 च्या कोथरूड विधानसभा निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभेच्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून भाजपकडून मंत्री पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात मनसेचे अ‍ॅड. किशोर शिंदे हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते.

या निवडणुकीत मंत्री पाटील विजयी झाले होते. मात्र, निवडणुकीतील निकालाला अ‍ॅड. शिंदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल होती. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावत मंत्री पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

Back to top button