संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन | पुढारी

संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारूडकार रामचंद्र देखणे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे पुण्यातील शनिवार पेठेतचं राहत होते. सोमवारी (दि.२६) सायंकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button