पिंपरी : केक शॉपची शाखा देण्याच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पिंपरी : केक शॉपची शाखा देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा  : केक शॉपची शाखा देण्याच्या बहाण्याने एकाची बारा लाख 12 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 8 ते 20 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन माध्यमातून रावेत येथे घडला. याप्रकरणी राजेश किरणचंद संघवी (53, रा. रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संघवी यांना एका नामांकित कंपनीच्या केक शॉपची शाखा सुरू करायची होती.

त्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला. त्या वेळी आरोपीने त्यांना अर्ज पाठवण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांना तीन वेगवेगळ्या बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर बारा लाख 12 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवले होते. त्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Back to top button