file photo
file photo

मंचर : पोलिसाची कॉलर पकडली; आरोपीवर गुन्हा दाखल

Published on

मंचर; पुढारी वृत्तसेवा: फुकट इंडिका गाडी दिली नाही तर माझ्याकडे पिस्टल आहे. मी तुला गोळ्या घालीन, तुझे गॅरेज पेटवून देईन, सर्व गाड्या फोडून तोडून नुकसान करेल, अशी धमकी एकाला दिल्याप्रकरणी आरोपी सलमान शमीम इनामदार (रा. फकीरवाडी, एकलहरे) याला पकडण्यासाठी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस जवान सुखदेव माताडे गेले असता, त्यांची कॉलर आरोपी इनामदार याने पकडली. त्यासंदर्भात शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा मंचर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रेनकुमार कहार यांचा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व गॅरेजचा व्यवसाय असून, काटे मळा मंचर येथे सलमान इनामदार हा गॅरेजवर गेला असता त्यांनी फिर्यादीकडे इंडिका कार (एम एच 02 एपी 3665) ही फुकट मागितली. गाडी दिली नाही तर माझ्याकडे पिस्टल आहे. मी तुला गोळ्या घालीन, तुझे गॅरेज पेटवून देईन, अशी धमकी दिली. याबाबतची फिर्याद कहार यांनी दाखल केली आहे. आरोपी सलमान इनामदार याला पकडण्यासाठी पोलिस जवान सुखदेव माताडे गेले असता, त्यांची कॉलर आरोपी सलमान इनामदार यांनी पकडली. त्यासंदर्भात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मंचर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news