इंदापूर : महोदया, आमच्याही आरक्षणाकडं लक्ष द्या; धनगर समाजाचे अर्थमंत्री यांना निवेदन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देताना आमदार राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, डॉ. शशिकांत तरंगे आदी.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन देताना आमदार राम शिंदे, हर्षवर्धन पाटील, डॉ. शशिकांत तरंगे आदी.
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: केंद्राकडून पाच राज्यांतील 12 जातींच्या शब्दांतील झालेल्या दुरुस्त्यांच्या धर्तीवर धनगड शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाचा समावेश अनुसूचीत जमाती प्रवर्गात करावा अशी मागणी करत धनगर ऐक्य परिषदेकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडे 'महोदया, आमच्याही आरक्षणाकडं थोडं लक्ष द्या' अशी साद घातली.

तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील 12 जातींच्या हिंदी व इंग्रजी भाषेच्या उच्चारांच्या शब्दांच्या दुरुस्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या या शब्द दुरुस्तीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेणे अपेक्षित होते; मात्र तो घेण्यात आला नाही. धनगर समाजाची गेले अनेक वर्षांपासून सरकारकडे असणारी मागणी प्रलंबित आहे. अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तंरगे यांनी निवेदनातून केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news