कुरकुंभ : डंपरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी | पुढारी

कुरकुंभ : डंपरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक जखमी

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: जिरेगाव- वासुंदे रस्त्यावर खडी वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर डंपरचालक फरार झाला आहे. याबाबत सदाशिव साहेबराव मचाले (वय 65, रा. जाधववाडी हनुमाननगर जिरेगाव, ता. दौंड) यांनी बुधवारी (दि. 21) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 17) सायंकाळी साडेसात वाजता जिरेगाव-वासुंदे रस्त्यावर घडला.

याबाबत अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचा फरसाण बनविण्याचा कारखाना आहे. कामगारांसाठी जेवण घेऊन पायी जाताना जिरेगाव-वासुंदे रस्त्यावर खडी वाहतूक करणाऱ्या पांढर्‍या रंगाच्या डंपरने फिर्यादी यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात त्याच्या उजव्या पायास, तसेच पंज्यास मार लागला. यासंदर्भात दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलिस नाईक महेश पवार करीत आहेत.

Back to top button