मावळात एकत्र बैलपोळा साजरा करण्यावर बंदी | पुढारी

मावळात एकत्र बैलपोळा साजरा करण्यावर बंदी

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : लम्पी रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात रविवारी एकत्र येऊन बैलपोळा साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुधीर भागवत व पशुधन विकास अधिकारी  यांनी दिली. याबाबत तालुक्यातील सर्व पोलिस ठाणे, मंडल अधिकारी, तलाठी यांना संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लम्पी रोगाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाने जनावरांचा बाजार भरवणे, शर्यत लावणे, जत्रा, प्रदर्शन आयोजित करणे यावर बंदी घातली आहे. दरम्यान, मावळ तालुक्यात अमावस्येच्या दिवशी बैलपोळा सण साजरा होणार असून, या निमित्ताने जनावरांची मिरवणूक होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अनेक जनावरे एकत्र येऊन या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली असून शेतकर्‍यांनी आपल्या बैलांची पूजा घरीच करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button