पुणेः कंपनीतील सहकार्‍याचा महिलेवर बलात्कार | पुढारी

पुणेः कंपनीतील सहकार्‍याचा महिलेवर बलात्कार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एकत्र कंपनीत काम करणार्‍या सहकार्‍याने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कामानिमित्त सुरत येथे घेऊन गेल्यानंतर नोकरीला लावल्याच्या कारणातून त्याने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर संबंधित महिलेच्या पतीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली.

मयंक हरिशभाई जोगी (वय 38, रा. गोंडल राजकोट, गुजरात) याच्याविरोधात हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून, एकाच कंपनीत काम करीत होते. महिलेला आरोपी नोकरीच्या कामानिमित्त सुरत येथे घेऊन गेला होता. तेेथील एका हॉटेलमध्ये महिलेला घेऊन जाऊन त्याने त्यांना नोकरीला लावले. या कारणातून शरीरसंबंध ठेवत महिलेला नोकरीचा राजीनामा देण्यास भाग पाडले आणि शहरातील विविध ठिकाणी आरोपीने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच, महिलेच्या पतीच्या मोबाईलवर वेगवेगळे अश्लील मेसेज पाठवून त्यांची बदनामी केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

Back to top button