पुणे : व्यवसायाच्या आमिषाने 44 लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : व्यवसायाच्या आमिषाने 44 लाखांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: व्यवसायात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची 44 लाख 11 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संजय शर्मा कंपनीचे वेगवेगळे खातेधारक, मोबाईलधारक अशा तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ताडीवाला रोड येथील 59 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 11 जून ते अद्यापर्यंतच्या कालावधीत घडला आहे.

आरोपींनी फिर्यादींना व्यवसायात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 44 लाख 11 हजार 626 रुपये त्यांच्याकडून वेळोवेळी घेतले. त्यानंतर संजय शर्मा कंपनीने फिर्यादींना कोणताही माल दिला नाही. मात्र, यापूर्वी पुरविलेला पुढील कंपनीने खरेदी करण्यास नकार देऊन बनावट ऑईलच्या व्यवसायाचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. दरम्यान, तक्रार अर्जाच्या चौकशीअंती ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घाडगे करीत आहेत.

Back to top button