निरा नदीत पडून लुमेवाडी येथील एक जण बेपत्ता | पुढारी

निरा नदीत पडून लुमेवाडी येथील एक जण बेपत्ता

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: भीमा नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी एकाचा तोल जाऊन तो पाण्यात वाहून गेला. ईरशाद बालिश पठाण (वय 33, रा. लुमेवाडी, ता. इंदापूर) असे त्याचे नाव आहे. वृत्त लिहीपर्यंत याबाबत इंदापूर पोलिसांत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही.

शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ईरशाद तीन मित्रांसोबत भगतवाडी बंधार्‍यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. याच दरम्यान त्याचा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडला. उजनी धरणातून मोठा विसर्ग भीमा नदीत सोडल्याने वाहून गेला. शनिवारी (दि. 17) तहसीलदार श्रीकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांसह इंदापूर पोलिस आणि महसूल पथकाने त्याचा दिवसभर शोध घेतला; मात्र त्यात अपयश आले.

Back to top button