पुणे : पावसाची अर्धा तास ‘बॅटिंग’; 13 सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस | पुढारी

पुणे : पावसाची अर्धा तास ‘बॅटिंग’; 13 सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहराच्या काही भागात मंगळवारी दुपारी अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यावर पाणी वाहिले तर काही भागात रस्त्यावर पाण्याची तळी साचली. पुढील 13 सप्टेंबरपर्यंत शहर व पिंपरी चिंचवड भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

शहरात बुधवारी सकाळपासूनच कडक ऊन व उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. काही वेळातच जोरदार पावसाने कोसळण्यास सुरुवात केली. वादळी वारे, विजांच्या कडकडाटात बरसलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली.

शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात 10 सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी केला आहे. याबरोबरच घाट माथ्यावर काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शहरात पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
शिवाजीनगर 15
पाषाण 7.8
लोहगाव 2
चिंचवड 2

 

Back to top button