पुणे : आगामी चार दिवस मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस | पुढारी

पुणे : आगामी चार दिवस मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आगामी चार दिवस मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला निघाला असला तरी महाराष्ट्रातून त्याचा प्रवास अजून सुरू व्हायचा आहे. मात्र मध्यप्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात आगामी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

5 ते 8 सप्टेंबरदरम्यान ‘यलो अलर्ट’
धुळे, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ या भागात पाच ते आठ सप्टेंबर या कालावधीत ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी केला आहे.

Back to top button