पिंपरी : सावधान ! आपली मुले स्कुल बसने प्रवास करतात का? | पुढारी

पिंपरी : सावधान ! आपली मुले स्कुल बसने प्रवास करतात का?

राहुल हातोले : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो विद्यार्थी स्कूल बसने प्रवास करतात. जर आपली मुले स्कूल बसने प्रवास करीत असतील तर सावधान! शहरातील उप प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या चार महिण्यात 200हून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे.
शासनाने विद्यार्थ्यांच्या वाहतूकीसाठी नियमावली बनवली आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणार्‍या शहरातील स्कूलबसवर उप प्रादेशिक विभागाने कारवाई करून दंड आकारला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाला ज्या स्कूलमधून शाळेत पाठवित आहात, त्याची स्वतः विचारपूस आणि माहिती घ्यावी तसेच काही त्रुटी आढळल्यास याविरोधात आरटीओकडे तक्रारी करू शकतात, असे आवाहन देखील या विभागाने केले आहे.

शहरातील स्कूल बस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून, धोकादायकरीत्या वाहने चालवित आहेत, अशा वाहनांवर कारवाई होत आहे. दोषी वाहनांकडून दंड आकारला जात असून, त्यांचे परमीटही रद्द होऊ शकते. म्हणून स्कूलबस चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
                 – अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर.

स्कूलबससाठी नियमावली :
स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना सहजा सहजी चढता-उतरता येईल, अशा पायर्‍या बसला असाव्यात.
बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी.
अग्निशमन यंत्रणा व सीसीटीव्ही यंत्रणा असावी.
बस 15 वर्षांहून जुनी नसावी.
कमी प्रकाश आणि धुके अशा वातावरणातही दिसून येणार्‍या पिवळ्या रंगाची स्कूल बस असावी.

Back to top button