पुणे : उजनी धरणातून नदीत पाणी सोडणे केले बंद | पुढारी

पुणे : उजनी धरणातून नदीत पाणी सोडणे केले बंद

पळसदेव, पुढारी वृत्तसेवा : यंदा भीमा खोर्‍यात जोरदार पाऊस झाल्याने उजनी धरण तुडुंब भरले आहे. मात्र, धरणातून थेट नदीत पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. धरणातून दररोज वीजनिर्मितीसाठी 1600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरण साखळीत पावसाने उघडीप दिल्याने उजनीत येणार्‍या पाण्याचा प्रवाह झपाट्याने कमी झाला आहे. सध्या उजनीत सुमारे 4700 क्युसेकने पाणी येत आहे.

उजनी धरणात सध्या 53.93 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मुख्य कालव्याला 2500 क्युसेकने आवर्तन सुरू आहे. तर सीना-माढा 222 क्युसेक, दहीगाव पाणी योजना 63 क्युसेक, बोगद्यातून 900 क्युसेक, वीजनिर्मितीसाठी 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणाच्या दरवाजातून थेट नदीत पाणी सोडणे तूर्तास बंद करण्यात आले आहे.

याबाबत उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे म्हणाले, “पुण्यातील पर्जन्यमान कमी झाल्याने उजनीत येणारा विसर्ग कमी झाला आहे. सध्या जेवढे पाणी येत आहे, तेवढे पाणी वीजनिर्मिती, कालवा, पाणी योजनेसाठी वापरले जात आहे. येणारा विसर्ग आणखी कमी झाल्यास वीजनिर्मिती प्रकल्पाचेही पाणी बंद केले जाईल.”

Back to top button