पुणे : नव्या मुगाच्या आगमनामुळे दरात घसरण; राजस्थान मटकीही उतरली

पुणे : नव्या मुगाच्या आगमनामुळे दरात घसरण; राजस्थान मटकीही उतरली
Published on
Updated on

पुणे : येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात नव्या मुगाची तुरळक आवक सुरू झाल्यामुळे मूग आणि मूगडाळीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. लवकरच नव्या मटकीची आवक सुरू होणार असल्यामुळे राजस्थान, गुजरात, तसेच पॉलिश मटकीच्या दरातही मोठी घसरण झाली. खरीप हंगामातील पिकांचे आगमन मुगाव्दारे होते. कर्नाटकातील गदम भागातील नव्या मुगाची आवक सुरू झाली असून, पुढील आठवड्यापासून पुण्याच्या बाजारातही तो उपलब्ध होईल. यामुळे मूग आणि मूगडाळीस मागणी मंदावली असून, दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे मागे 100 ते 200 रुपयांनी घट झाली.

मागणी कमी असल्यामुळे मसूरडाळ आणि उडीदडाळीचे दरही आणखी 100 ते 200 रुपयांनी कमी झाले. तूरडाळीच्या दरातही आणखी 200 रुपयांनी घट झाली. मात्र, मटकीडाळीचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. लवकरच नव्या मटकीची आवक सुरू होणार असल्यामुळे गावरान, पॉलिश, तसेच राजस्थान आणि गुजरात मटकीच्या दरातही मोठी घसरण सुरू आहे. गेल्या आठवड्यातही गावरान आणि सेलम मटकी वगळता अन्य सर्व मटकीच्या दरात क्विंटलमागे आणखी 400 ते 500 रुपयांनी घट झाली. आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व कडधान्यांचे दर स्थिर होते. आवक -जावक साधारण असल्यामुळे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, तसेच आटा, रवा आणि मैद्याचे दर स्थिर होते. भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने आट्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे मिलबर गव्हाची दरवाढ थांबली आहे.

शेंगदाणा तेल महागले, अन्य खाद्यतेले उतरली
तुटवड्यामुळे शेंगदाणा तेलाचे दर तेजीत असून, गेल्या आठवड्यात दरात 15 किलोंच्या डब्यामागे आणखी पन्नास रुपयांनी घट झाली. मात्र, आयाती खाद्यतेल मोठ्या प्रमाणात देशात येत असल्यामुळे सोयाबीन, पामोलिन, तसेच सूर्यफूल तेलाचे दर मंदीत आहेत. गेल्या आठवड्यातही सरकी, सोयाबीन, पामोलिन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात 15 लिटरच्या डब्यामागे आणखी 30 रुपयांनी घट झाली. वनस्पती तुपाचे दरही 15 किलोंमागे 30 ते 40 रुपयांनी उतरले.

गूळ तेजीत, साखर स्थिर
सध्या कराड, सांगली, तसेच दौंड भागातील गुळास राज्यातील पेठांमधून, तसेच अन्य राज्यातूनही मागणी आहे. यामुळे गुळाची दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही गुळाच्या दरात क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मागणी साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3600 ते 3650 रुपये होता.

भाताच्या तुटवड्यामुळे पोह्याचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहाचले आहेत. याचा थेट परिणाम पोह्यांवर झाला असून, दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यातही कांदा पोह्याच्या दरात क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी वाढ झाली. नवा भात निघेपर्यंत ही स्थिती राहील, असा अंदाज आहे.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) :3600-3650 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2800-2850, रिफाइंड तेल ः 2500-3100, सरकी तेल 2125-2575, सोयाबीन तेल 1925-2125, पामतेल 1825-2050, सूर्यफूल रिफाइंड तेल 2325-2525, वनस्पती तूप :1600-2200, खोबरेल तेल 2250 रु.

तांदूळ : गुजरात उकडा 3500-3800, मसुरी 3200-3500, सोनामसुरी 4000-4300, एच.एम.टी. कोलम 4700-5000, लचकारी कोलम 5500-6500, चिन्नोर 4000-4500, 1121-1100-12000, आंबेमोहोर (सुवासिक) 7500-8500, बासमती अखंड 11000-11500, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5500, बासमती कणी 3200-3500, 1509- 7500-8500 इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3500-3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3400, एम.पी. लोकवन 2900-3600, सिहोर नं. 1 4800-5500, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3200-3600, मिलबर 2750-2800 रु.

ज्वारी : गावरान नं. 1-4200-4500, गावरान नं. 2-3400-3800, नं. 3 3000-3200, दुरी 3200-3200 बाजरी : महिको 3000-3200, गावरान 2700-2800, हायब्रीड 2600 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 4000-4200, गूळ नं.1: 3750-3900, गूळ नं. 2 : 3550-3700, गूळ नं.3 : 3400-3500, बॉक्स पॅकिंग 3700-4800, पाव किलो बॉक्स 4200-4500 रु.

डाळी : तूरडाळ 10000-11000, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 8500-8700, मसूरडाळ 8000-8200, मटकीडाळ 11000-11500, उडीदडाळ 9000-10500 रु.
कडधान्ये : हरभरा 5500-5600, हुलगा- 6500-7000 चवळी 7500, चवळी भारी 8000 मसूर 7800-8000, मूग 7000-7500, मटकी गावरान 12500, मटकी पॉलिश 9200-92000, मटकी गुजरात 9000-92000, मटकी राजस्थान 9000-9200, मटकी सेलम 13500-14000, वाटाणा हिरवा 5000-5500, वाटाणा पांढरा 6500-6700, काबुली चणा 9000-11000 रु.

साबुदाणा : साबुदाणा नं.1 8000, साबुदाणा नं.2 7800, साबुदाणा नं.3 7500 रु.
वरई भगर :11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1600-1800 रु.
शेंगदाणा : जाडा 10500-11000, स्पॅनिश – 11500, घुंगरू 10500-11000, टीजे 9100-9200 रु.
धने : गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल 2700-2950, पिवळा 2650-2700, पांढरा 2600-3500 रु.

पोहे : मध्य प्रदेश 4100-4400, पेण 4000-4200, मध्यम पोहा-4100-4400, दगडी पोहा 4000- 4800, पातळ पोहा 4600-5300, सुपर पोहा 4400-4800, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 3300-3500, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450-475, सुरती 475-500 रु.

रवा, मैदा, आटा : (50 किलोंचा भाव) आटा 1500-1550, रवा 1600-1650, मैदा 1600-1650 रु. बेसन : (50 किलोस) 3400-3700 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मिरी ढब्बी 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु.
नारळ : (शेकड्याचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना
1500-1550, सापसोल 2000-2700 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news