हिरवी मिरची, गाजर, फ्लॉवर महागले; ढोबळी मिरची, वांगी स्वस्त

गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची झालेली आवक
गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची झालेली आवक
Published on
Updated on

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांना मागणी कायम असून, बहुतांश फळभाज्यांचे भाव टिकून आहेत. बाजारातील आवकच्या तुलनेत मागणी वाढल्याने हिरवी मिरची, गाजर, फ्लॉवरच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणीअभावी ढोबळी मिरची व वांगीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी गेल्या आठवड्याइतकीच फळभाज्यांची आवक झाली. बहुतांश फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने दर टिकून होते. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 28) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, इंदौर येतून 9 ते 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो पावटा व 3 टेम्पो घेवडा,तर मध्य प्रदेशातून लसणाची 13 ते 14 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1200 ते 1300 पोती, टोमॅटो 9 ते 10 हजार क्रेटस, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 40 ते 50 गोणी, मटार 400 ते 500 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 50 ट्रक यांसह इंदूर आणि आग्रा येथून बटाट्याची 55 ट्रक इतकी आवक झाली.

पालेभाज्यांच्या भावात घसरण

पालेभाज्यांच्या भावात घसरण
पालेभाज्यांच्या भावात घसरण

रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली. आवकच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 5 रुपये, शेपू चार रुपये, कांदापात, चाकवत आणि चुका प्रत्येकी दोन रुपये, तर पालक तब्बल दहा रुपयांनी उतरला. तर, करडईच्या भावात एक रुपयांनी घट झाली आहे़ मागणी वाढल्याने मेथीच्या भावात तीन रुपये, तर अंबाडी आणि चवळईच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली. रविवारी बाजारात कोेथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 4 ते 20 रुपये, तर किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये इतके राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news