पिंपरी : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

पिंपरी : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे दोन वर्षे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, नदीकाठावरील विसर्जन घाट व कृत्रिम हौद तयार करण्यात येत आहेत. तसेच, रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे बाजारापेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाचे बुधवारी (दि.31) वाजतगाजत आगमन होत आहे. शहरात अडीच हजार लहान- मोठे गणेश मंडळ आहेत. तसेच, हाऊसिंग सोसायटी आणि घरगुती गणपतींची संख्या लाखांच्या घरात आहे.

मोठ्या प्रमाणात साजरा होणार्‍या गणेशोत्सवाच्या दृष्टीने पालिकेच्या यंत्रणा सतर्क झाले आहेत. शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदी काठावरील विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात येत असून, तेथील कृत्रिम हौद दुरूस्त करून स्वच्छ करण्यात येत आहेत. तसेच, निर्माण कुंड व पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, पर्यावरणप्रेमी संख्यांची मदत घेऊन मूर्ती स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.

त्या ठिकाणी विसर्जनाच्या दिवशी सुरक्षारक्षकांसह जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, बोट व नावेची सोय केली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्या संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. पावसामुळे शहरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते युद्धपातळीवर दुरूस्त करून घेण्यात येत आहेत. स्थापत्य विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात शहरात एकही रस्ता खड्डेमय असणार नाही, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

गणेशोत्सव कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधित विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. महत्वाच्या ठिकाणी कंट्रोल रूमची उभारणी करून त्याद्वारे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी ड्रोनचे कॅमेरे असणार आहेत. तसेच, या काळात शहरातील पाणीपुरवठा पुरेसा व सुरळीत राहील याबाबत पाणीपुरवठा विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने तयारी केली आहे.

मंडळाच्या पावत्या फाडून माजी नगरसेवकांना 'ताप'
गणेशोत्सव काळात सर्वच सार्वजनिक गणेश मंडळे सक्रिय होतात. मंडळांकडून रहिवासी, दुकानदार, विक्रेते तसेच नगरसेवक व पदाधिकार्‍यांकडून सक्तीने वर्गणी घेतली जाते. दोन वर्षे गणेशोत्सव न झाल्याने यंदा अधिक रकमेची पावती फाडली जात आहे. मंडळाच्या पावतीचा आकडा पाहून माजी नगरसेवकांना घाम फुटत आहे. प्रभागातील तसेच आसपासच्या मंडळांच्या वर्गणीचे आकडे ऐकून ते अक्षरश: चक्रावून गेले आहेत. माजी नगरसेवकांसमोर मंडळाचे सदस्य वर्गणीच्या आकड्यासाठी आडून बसत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आवाजही वाढला आहे. मंडळ आपलेसे करण्यासाठी काही माजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी यंदा हात
मोकळा सोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news