पुणे : लग्नानंतर 5 महिन्यांत महिलेची आत्महत्या | पुढारी

पुणे : लग्नानंतर 5 महिन्यांत महिलेची आत्महत्या

पुणे : लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत विवाहित तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा बुद्रुक येथील काझी चौकातील आशियाना ड्रीम्समध्ये घडला. याप्रकरणी सासरच्यांवर कोंढवा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाराणी संदीप वाघे (24, रा. आशियाना ड्रिम्स, कोंढवा बुद्रुक) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत तरुणीचा भाऊ सिद्धलिंग कुसनेरे (19, रा. मु. पो. नागराळ, ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलेचा पती संदीप नामदेव वाघे, सासू शकुंतला वाघे, यशोदा राहुल लिंबाचे (सर्व रा. आशियाना ड्रिम्स, कोंढवा बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी संदीप वाघे याच्याबरोबर 28 मार्च 2022 रोजी विवाह झाला होता.

विवाहानंतरच आरोपींची टोमणेबाजी सुरू झाली. तिला स्वयंपाक येत नाही, काही जमत नाही, तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी होऊ लागली. याच त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक खेतमाळस करीत आहेत.

Back to top button