बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाही येणार! 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत हलक्या-मध्यम पावसाची शक्यता | पुढारी

बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाही येणार! 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत हलक्या-मध्यम पावसाची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील पावसाचा अंदाज येण्यासाठी पुणे वेधशाळेने खास यंत्रणा विकसित केली आहे. दहा दिवसांत शहरातील पावसाचा अचूक अंदाज त्याद्वारे दिला जाणार आहे. 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज या विकसित केलेल्या अ‍ॅपने दिला आहे. पाऊस आता परतीच्या वाटेकडे निघाला आहे. त्यातच गणेशोत्सव आल्याने पावसाचा दर तासाचा अंदाज देता यावा यासाठी पुणे वेधशाळेने ही सोय मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेत केली आहे. हवामान तज्ज्ञ प्रदीप राजमाने यांच्या सहकार्याने हा अंदाज तयार झाला आहे.

30 पासून पावसाची शक्यता…
पुणे वेधशाळेतील विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, शहरात 30 पासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. हा पाऊस 3 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. त्या पुढचा अंदाज 4 सप्टेंबरपासून दिला जाणार आहे.

Back to top button