पिंपरी : कोरोनाची रुग्णसंख्या शंभरी पार | पुढारी

पिंपरी : कोरोनाची रुग्णसंख्या शंभरी पार

पिंपरी : शहरात कोरोनाची रुग्णसंख्या शुक्रवारी (दि. 26) शंभरच्या पुढे पोहचली. दिवसभरात 104 बाधित रुग्ण आढळले. गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधित रुग्ण दररोज 50 ते 80 दरम्यान आढळत होते. आज हा आकडा शंभरीपार गेला. शुक्रवारी 85 रुग्ण बरे झाले. तर, 887 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 15 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 474 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. शहरात आज अखेर एकूण 3 लाख 69 हजार 688 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 65 हजार 302 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 628 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button