इंदापुरातून वाहणार्‍या भीमा, निरा नद्या तुडुंब! भीमेत 21,600, नीरेत 14,511 क्युसेकचा विसर्ग | पुढारी

इंदापुरातून वाहणार्‍या भीमा, निरा नद्या तुडुंब! भीमेत 21,600, नीरेत 14,511 क्युसेकचा विसर्ग

बावडा; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातून वाहणार्‍या भीमा व निरा या नद्या सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. भीमा नदीमध्ये उजनी धरणातून 20 ऑगस्टपासून 21,600 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 25) सहाव्या दिवशीही तो कायम आहे. तर वीर धरणातून निरा नदीत 14,511 क्युसेकने विसर्ग गुरुवारी (दि. 25) सुरू होता. भीमा व निरा नद्या घटमाथ्यावरील दमदार पावसामुळे अनेक महिन्यांपासून तुडुंब भरून वाहत आहेत. वीर धरणातून निरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग गुरुवारी दुपारी 23,185 क्युसेक होता.

मात्र, दुपारनंतर तो कमी करून 14,511 क्युसेक करण्यात आला. श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे भीमा व निरा नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी एकत्रित पाण्याचा विसर्ग गुरुवारी 36,111 एवढा होता. नदीकाठच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सध्या मार्गी लागला आहे, अशी माहिती निरा-भीमा साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे (सुरवड), प्रतापराव पाटील (निरनिमगाव) व प्रकाश मोहिते (टणू) यांनी दिली. दरम्यान, सध्या भीमा व निरा नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने नदीपात्राचे सौंदर्य बहरले आहे. त्यामुळे या नद्यांवरील पुलाच्या ठिकाणी नागरिक सौंदर्य पाहण्यासाठी थांबत आहेत.

 

Back to top button