वालचंदनगर : जांब येथील महिलेच्या खुनाचा उलगडा | पुढारी

वालचंदनगर : जांब येथील महिलेच्या खुनाचा उलगडा

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: जांब (ता. इंदापूर) येथे एका महिलेचा नुकताच खून झाला. या प्रकरणाचा अवघ्या तीन तासांत छडा लावून आरोपीस पोलिसांनी अटक केली. संगीता पांडुरंग वाघमारे (वय 45, रा. वडजल, ता. माण, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (दि.24) सकाळी दहाच्या सुमारास गावाच्या शेजारील उसाच्या शेतात नागरिकांना या महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी संशयित आरोपी अक्षय बाळू साठे (वय 21, रा. जांब) याला अटक केली.

गेल्या काही दिवसांपासून संगीता या जांब गावामध्ये आपल्या मुलीकडे राहात होत्या. दरम्यान, मंगळवारी जांब गावातील महेंद्र मच्छिंद्र गायकवाड व संगीता यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. यामध्ये महेंद्र यांना संगीता यांनी शिवीगाळ केली होती. यामुळे महेंद्र यांचा नातेवाईक असलेल्या अक्षय याला राग आला. त्याने संगीता यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला व मृतदेह उसाच्या शेतातील बांधावर टाकून दिला होता. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, राम मेटापल्ली आदींनी हा तपास

Back to top button