पिंपरी : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा

पिंपरी : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा
Published on
Updated on

पिंपरी : तोतया पोलिसांनी तरुणीचा हात धरून तिचा विनयभंग केला. ही घटना पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. 23) रात्री घडली.
प्रसन्न राजेंद्र टिळे (27, रा. शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने बुधवारी (दि. 24) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

आरोपी फिर्यादी पीडित तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करीत होता. दरम्यान, फिर्यादी घराच्या पायर्‍या चढत असताना शिवीगाळ केली. तसेच, तिचा विनयभंग केला. फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर त्यांचा भाऊ सोडवण्यास आला असता त्यासही मारहाण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news