पुणे : वाहन चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त | पुढारी

पुणे : वाहन चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुचाकी चोरी करणार्‍या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, शिवाजीनगर आणि फरासखाना पोलिस ठाण्यातील तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रवि दशरथ वाकोडे ( वय 38, रा. संगमवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

वाकोडेने गाडी चोरीची असल्याचे चौकशीत समोर आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

Back to top button