पुणे : 16 लाखांचा गुटखा, तंबाखूचा साठा जप्त | पुढारी

पुणे : 16 लाखांचा गुटखा, तंबाखूचा साठा जप्त

पुणे : सुगंधित तंबाखू, पान मसाल्यासह नामांकित कंपन्यांचा तब्बल 16 लाख 46 हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. युनिट सहाच्या पथकाने केसनंद परिसरातील माने वस्ती येथे ही कारवाई केली असून, अवैधरीत्या साठा केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. संदीप भिकचंद चोरडिया (वय 48, रा. वाघोली), गोपाल ज्ञानदेवराव शेंडे (वय 42), विशाल दिनेश सोळंकी (वय 30, रा. वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी तिघांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, युनिट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button