लोणी काळभोर : वाढत्या अपघातांबाबत गडकरींशी बोलणार : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

लोणी काळभोर : वाढत्या अपघातांबाबत गडकरींशी बोलणार : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
Published on
Updated on

लोणी काळभोर; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे या महामार्गावरील वाढलेली वाहतूक होय. त्यामुळे पुणे-अहमदनगर महामार्गावर उभारण्यात येणार्‍या दुमजली उडाणपुलाप्रमाणे या मार्गावर देखील हडपसर पंधरा नंबर ते उरुळी कांचन येथील खेडेकरमळा यादरम्यान उड्डाणपूल तयार करण्यात यावा, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

या वेळी नीलेश काळभोर, उल्हास तुपे, विपुल शितोळे, उदय काळभोर, प्रवीण काळभोर, विशाल गुजर, गजानन काळभोर, मयूर काळभोर, अजिंक्य चौधरी, आप्पा गोरे, नितीन टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे-सोलापूर महामार्गावर गेल्या आठवड्य़ात रस्ते अपघातात दोन सख्ख्या बहिणी मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या पालकांची भेट घेऊन आढळराव पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news