चाकण : काम सांगितल्याच्या रागातून दोघांना मारहाण

चाकण : काम सांगितल्याच्या रागातून दोघांना मारहाण
Published on
Updated on

चाकण; पुढारी वृत्तसेवा: कंपनीत काम सांगितल्याच्या कारणावरून चार कामगारांनी दोघांना कंपनीतून बाहेर आल्यानंतर बेदम मारहाण केली. ही घटना चाकण एमआयडीसीमध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीच्या गेटवर आंबेठाण (ता. खेड) येथे घडली. अनिकेत बंडू पोटे (वय 22, रा. कडूस, ता. खेड), सूरज वारे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत यांनी महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार ओमकार शेवाळे, ओमकार भैय्ये, मिलिंद जाधव, लखन शेवाळे (सर्व रा. शेवाळवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र सूरज वारे काम झाल्यानंतर सोमवारी (दि.22) सायंकाळी कंपनीच्या बाहेर आले. तिथे आरोपींनी त्यांना अडवले. 'कंपनीत काम सांगणारे तुम्ही कोण, आम्ही आमचे काम करतो. तुम्ही ढवळाढवळ कशाला करता,' असे म्हणून ओमकार शेवाळे याने लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारला. सूरज वारे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही दगडाने मारहाण केली. त्यांनतर शिवीगाळ करून आरोपी निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news