सिंहगड अतिक्रमणमुक्त; वनविभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारवाईत 12 टपर्‍या जमीनदोस्त

सिंहगड किल्ल्याच्या पुणे दरवाजा मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवर बुधवारी कारवाई करताना वनविभागाचे अधिकारी.
सिंहगड किल्ल्याच्या पुणे दरवाजा मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवर बुधवारी कारवाई करताना वनविभागाचे अधिकारी.
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्री स्टॉल, टपर्‍या अशा नवीन बारा अतिक्रमणांवर बुधवारी (दि. 24) वन विभागाने कारवाई केली. चार तासांच्या मोहिमेदरम्यान अतिक्रमणे हटविण्यात आल्याने टपर्‍या दुकानांनी गजबजलेल्या गडावरील वाहनतळापासून पुणे दरवाजा मार्ग, तानाजी कडा आदी परिसराने काही प्रमाणात सुटकेचा श्वास घेतला. कारवाई करण्यात आलेले सर्व विक्रेते सिंहगड पायथ्याच्या मोरदरी, कल्याण अवसरवाडी भागातील आहेत. या विक्रेत्यांना गडावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली नाही; मात्र टपर्‍या स्टॉल उभारण्यास मनाई आहे, असे वनविभागाने स्पष्ट केले.

सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले, 'वन अधिनियम कायद्याअंतर्गत नव्याने बांधलेल्या खाद्य विक्रेत्यांवर कारवाई करीत बारा टपर्‍या, स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. आधीच्या 72 खाद्य पदार्थ व इतर विक्री दुकाने, टपर्‍यांची नोंद केली आहे. त्यांच्यावर तूर्त कारवाई केली नाही. वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या देखरेखीखाली वनपरिमंडल बाबासाहेब लटके, बाळासाहेब जिवडे, वैशाली हाडवळे, रामेश्वर तेलावरे, कोमल सपकाळ व सुरक्षारक्षक अशा तीस जणांच्या पथकाने अतिक्रमण कारवाईची मोहीम राबवली.

नोटिशीनंतरच कारवाई
वाहनतळ, तानाजी कडा, पुणे दरवाजा मार्ग आदी परिसरात लाकूड, बांबू, लोखंड अशा वापरून टपर्‍या उभारल्या होत्या. या विक्रेत्यांना वनविभागाने टपर्‍या, स्टॉल काढण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. त्याबाबतच्या नोटिशीही देण्यात आल्या होत्या, मात्र कोणीही अतिक्रमणे काढली नाही. त्यामुळे कारवाई करण्यात आली, असे वनपरिमंडल अधिकारी लटके यांनी सांगितले.

स्थानिक विक्रेत्यांसाठी जागा विकसित करावी
सिंहगडावरील नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हॉटेल व्यावसायकि संघटनेचे विजय मुजुमले म्हणाले, 'वनविभागाने येथील अतिक्रमणे हटवली असली तरी येथील खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या व्यावसायिकांच्या उपजिविकेसाठी खाद्यपदार्थ विक्री ठिकाणांचे योग्य नियोजन करावे. पर्यटक, शिवभक्तांना ये-जा करताना अडथळे निर्माण होणार नाही, याची काळजी घेत असतानाच गेल्या 2-3 दशकांपासून येथे व्यवसाय करणार्‍या स्थानिक विक्रेत्यांसाठी जागा विकसित करावी.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news