पिंपरी : महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

molestation
molestation
Published on
Updated on

पिंपरी : महिलेच्या घरात जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी परिसरात घडली.
श्रीकांत खरात (35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. 22) फिर्याद दिली आहे.

आरोपीने त्याच्या बहिणीकडून फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्रास दिला. महिलेने आरोपीकडे दुर्लक्ष केले असता पाठलाग करून त्यांचा विनयभंग केला. तसेच, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपी श्रीकांत फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news