पुणे : दरोड्याच्या तयारीतील सात जण जेरबंद

पुणे : दरोड्याच्या तयारीतील सात जण जेरबंद
Published on
Updated on

पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 20 मोबाईल व इतर साहित्य असा 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बिहार व दिल्ली येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी दिल्ली, हैदराबाद, पुणे, मुंबई, गुजरात असा रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांनी हे मोबाईल चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.

सर्व आरोपी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरत होते. त्यांनी हैदराबाद, गुजरात, मुंबई, दिल्ली येथे देखील चोर्‍या केल्या आहेत. टोळीतील विजय गगनदेव महातू व अशोक कुमार महातू यांच्याविरुद्ध दिल्ली व सिकंदराबाद येथील पोलिस ठाण्यांत मोबाईल चोरी व जबरी चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, कर्मचारी नीलेश साबळे, अनिकेत बाबर, राहुल मखरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news