पिंपरी : शहरात कोरोनाचे 70 बाधित रुग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात कोरोनाचे 70 बाधित रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी -चिंचवड शहरात शनिवारी (दि. 20) दिवसभरात कोरोनाची बाधा झालेलेल 70 रुग्ण आढळले आहेत. तर, आकुर्डी येथील महापालिकेच्या रुग्णालयात सध्या 4 रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 25 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यातील 10 रुग्णांवर आकुर्डीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आकुर्डी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 10 रुग्णांपैकी 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. त्यांना अ‍ॅाक्सिजन देण्यात येत आहे. अन्य रुग्णांवर वॉर्डात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज दिवसभरात 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरात सध्या गृहविलगीकरणात 378 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. शहरात आज अखेर 3 लाख 69 हजार 269 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 64 हजार 969 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

तर, 4 हजार 628 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या घटलेली आहे; मात्र तरीदेखील नागरिकांनी कोरोनाबाबतच्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे; तसेच नागरिकांनी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करून घेणेही गरजेचे आहे.

Back to top button