पुण्याच्या शुभंकरची महाराष्ट्र संघात निवड

शुभंकर खवले
शुभंकर खवले
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात पुण्याच्या शुभंकर खवले याची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या वतीने अहमदाबाद, गुजरात येथे 5 ते 9 ऑक्टोबर रोजी होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघ निवड चाचणी घेण्यात आली. ही स्पर्धा 15 वर्षांवरील गटासाठीच (खुला गट) ठेवण्यात आली होती.

महाराष्ट्रातील 19 संघ यात सहभागी झाले होते. कर्णधार म्हणून मुलांमध्ये पुणे जिल्ह्याचा व महाराष्ट्रीय मंडळाचा खेळाडू शुभंकर खवले आणि मुलींमध्ये मुंबई उपनगरची रूपाली गंगावणे (सुखहारा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, चेंबूर) यांची निवड झाली आहे.शुभंकर खवले हा अभिजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news