पुणे : कामाच्या वादातून तरुणाला मारहाण | पुढारी

पुणे : कामाच्या वादातून तरुणाला मारहाण

पुणे : पूर्वीच्या कामाच्या पैशांवरून वाद घालत तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. त्याची दुचाकीही पळवून नेली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अमोल नगरकर (वय 32) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला.

तक्रारदार व संशयित आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अमोलला तिघांनी पाच मजली इमारतीच्या प्लबिंगचे व कोर कटिंगचे काम आहे, अशी बतावणी करून बोलावले. अमोल येताच त्याच्याशी खराडी येथे केलेल्या कामाचे पैसे राहिल्यावरून वाद घातला. त्याला मारहाण केली व त्याच्याकडील 50 हजार रुपयांची मोपेड दुचाकी पळवून नेली.

Back to top button