पुणे : मोबाईल चोरीच्या घटना थांबेनात | पुढारी

पुणे : मोबाईल चोरीच्या घटना थांबेनात

पुणे : विश्रांतवाडी, तसेच येरवडा भागात पादचार्‍यांचे मोबाईल हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या तक्रारीत 21 वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील फुलेनगर बस स्टॉपसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

येरवड्यामधील प्रतीकनगर येथे मध्यरात्री पादचारी तरुणाच्या हातातील 5 हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावला. याबाबत अमीना मुनेर मुल्ला (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रात्री बाराच्या सुमारास फोनवर बोलत जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला.

Back to top button