पुणे : दंड आकारल्याने दुचाकीस्वारांकडून पोलिसाला मारहाण | पुढारी

पुणे : दंड आकारल्याने दुचाकीस्वारांकडून पोलिसाला मारहाण

पुणे : उलट्या दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांना अडवून वाहन परवाना नसल्याचा दंड आकारल्यानंतर दुचाकीस्वारांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना टिळक चौकात घडली. या प्रकरणी पोलिसांनी रोहन बाबासाहेब जावळे (वय 27) व प्रेम यशवंत राऊत (वय 20, रा. शिवाजीनगर) यांना अटक केली आहे. त्यांच्या दोन साथीदारांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस अंमलदार संपत करवंदे यांनी तक्रार दिली आहे.

अंमलदार करवंदे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी प्रेम व रोहन दुचाकीने केळकर रोडने टिळक चौकाकडे जाणार्‍या एकेरी रोडने विरुद्ध दिशेने जात होते. त्यामुळे करवंदे यांनी त्यांना अडविले व वाहन परवाना मागितला; पण त्यांनी करवंदे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर करवंदे यांनी वाहन परवाना नसल्याचा दंड आकारला. यात राग आल्यानंतर साथीदारांना बोलावून घेत त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

Back to top button