गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या | पुढारी

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

बेल्हे : बेल्हे (ढगीमळा) येथील एका 38 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन शुक्रवारी (दि. 19) आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवनाथ हरिभाऊ पाबळे (वय 38 वर्षे, रा. ढगीमळा, बेल्हे) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ पाबळे यांनी राहत्या घराजवळील गोठ्यात लोखंडी अँगलला दोर बांधून गळफास घेतल्याची खबर गणेश हरिभाऊ पाबळे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली.

ही आत्महत्या नैराश्याच्या कारणातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद केल्याचे सहायक फौजदार अंकलेश्वर भोसले यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोसावी करीत आहेत.

Back to top button