पदवी प्रमाणपत्रासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आवाहन | पुढारी

पदवी प्रमाणपत्रासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 121 वा पदवी प्रदान समारंभ लवकरच घेण्यात येणार असून, यासाठी ऑक्टोबर/नोव्हेंबर 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा,’ असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

‘विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जाचा नमुना, शुल्काबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे,’ अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली.

Back to top button