पुणे : नग्न अवस्थेतील तरुण शिरला घरात! | पुढारी

पुणे : नग्न अवस्थेतील तरुण शिरला घरात!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एक तरुण मध्यरात्री नग्न अवस्थेत महिलेच्या घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे घडला. याबाबत32 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी यशवंतनगर (येरवडा) परिसरातील 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्शना शेलार यांनी सांगितले, ‘अविवाहित असलेला हा तरुण हा रिक्षाचालक आहे. दिवसभर रिक्षा चालवितो. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तो नग्न अवस्थेत फिर्यादी महिलेच्या घरात शिरला.

तिच्या शेजारी झोपण्याचा प्रयत्न करत असताना महिलेला जाग आली. त्यानंतर त्याने तिचे तोंड दाबले. फिर्यादींनी सुटका करत घराबाहेर आरडा ओरडा करत आली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. तोपर्यंत तरुण हा पसार झाला होता. महिलेने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल करत पसार झालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

त्याने केलेल्या कृत्याची माफीदेखील मागितली आहे. त्याची मानसिक स्थितीही चांगली आहे, परंतु, त्याने हा प्रकार का केला, त्याच्याकडून याबाबत काही सांगण्यात आले नाही. महिलेच्या घरात शिरण्यापूर्वीही याच रात्री इतर महिलांच्या घरात शिरल्याचे समोर आले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Back to top button