पुण्याहून जाणार्‍या रेल्वेच्या काही गाड्या रद्द | पुढारी

पुण्याहून जाणार्‍या रेल्वेच्या काही गाड्या रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात येणार्‍या रायगढ- झारसुगूडा रेल्वेमार्गावरील हिमगिर स्थानकावर चौथ्या रेल्वे मार्गाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. याचा परिणाम पुण्याहून जाणार्‍या काही रेल्वे गाड्यांवरदेखील पडला असून काही रेल्वे या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-हावडा- पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस 21 ते 28 ऑगस्टदरम्यान रद्द राहणार आहे.

यासह 20, 25 आणि 27 ऑगस्ट रोजी रवाना होणारी हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस तसेच, 22, 27 आणि 29 ऑगस्ट रोजी रवाना होणारी हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेसदेखील रद्द राहणार आहे. 22, 26 आणि 29 ऑगस्ट रोजी रवाना होणारी हटिया-पुणे एक्स्प्रेस तसेच 24, 28 आणि 31 ऑगस्ट रोजी रवाना होणारी पुणे-हटिया एक्स्प्रेसदेखील रद्द राहणार आहे. या रेल्वेंसह 20 आणि 27 ऑगस्ट रोजी रवाना होणारी संतरागाछी- पुणे एक्स्प्रेस तसेच 22 आणि 29 ऑगस्ट रोजी रवाना होणारी पुणे-संतरागाछी रेल्वेदेखील रद्द राहणार आहे, अशी माहिती पुणे रेल्वे प्रशासनाने दिली.

 

Back to top button