पुणे : भिशीत साडेचार लाखांचा अपहार | पुढारी

पुणे : भिशीत साडेचार लाखांचा अपहार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भिशीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून 4 लाख 60 हजार न देता फसवणूक करत धमकाविणार्‍या तीन जणांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललितादेवी मनोजकुमार सिंग, मनोजकुमार सिंग (60) आणि मनीषकुमार मनोजकुमार सिंग (30, सर्व रा. चिंतामणी सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजित प्रभू ठाकूर (35, रा. श्रीनाथनगर, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे.

ललितादेवी यांनी सुरू केलेल्या भिशीमध्ये फिर्यादी यांना सभासद होण्यास भाग पाडून फिर्यादी यांच्या घरी जाऊन प्रत्येक महिन्याला भिशीची रोख व ऑनलाईन स्वरूपात मिळून 3 लाख 49 हजार रूपये भरले. भिशीची मुदत संपल्यानंतरदेखील ललितादेवीने उशिरा भिशीमध्ये सामील झाल्याचे कारण सांगून 50 हजार रुपयेही घेतले. अजित ठाकुर आणि त्यांची पत्नी भिशीचे पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता नमूद आरोपी यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादी यांना मुदत संपल्यानंतर मिळणारे 4 लाख 10 हजार आणि नंतर दिलेले 50 हजार असे एकूण 4 लाख 60 हजार रुपये न देता फसवणूक केली.

 

Back to top button