75 ध्वज घेऊन बुलेट धावली ! | पुढारी

75 ध्वज घेऊन बुलेट धावली !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहाटेपासून घरोघरी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त लगबग सुरू होती. दिवस उजाडल्यानंतर ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बच्चे कंपनीपासून थोर मंडळी सकाळी घराबाहेर पडली. त्यामुळे पांढर्‍या शुभ्र कपड्यात हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेतलेल्या नागरिकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते.

ध्वजवंदनाच्या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांतून देशाभिमान जागविण्यात आला, तर संस्था-संघटनांच्या सामाजिक उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन अनोख्या रीतीने साजरा करण्यात आला. अमृतमहोत्सवी दिनानिमित्त कुठे दुचाकी रॅली, तर कुठे नृत्याचे कार्यक्रम झाले…कुठे विविध स्पर्धा, तर कुठे चित्रांतून देशाचा स्वातंत्र्यलढा अधोरिखित केला. घरोघरी, सोसायट्यांमध्ये, इमारतींवर तिरंगा ध्वज लावून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.

टपाल कार्यालयाच्या जीपीओमध्ये सीनिअर पोस्टमास्तर आर. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर 75 तिरंगा ध्वज लावलेली बुलेट बलदीप सिंग यांनी कार्यक्रमस्थळी आणली. या वेळी डेप्युटी पोस्टमास्तर एन. एस. बनकर, एस. एन. भिकुले, जनसंपर्क अधिकारी ए. बी. नहाटे, जोतिराम माळी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button