पिंपरी : स्वामी विवेकानंद स्कुल मध्ये शूरवीरांना मानवंदना | पुढारी

पिंपरी : स्वामी विवेकानंद स्कुल मध्ये शूरवीरांना मानवंदना

तळेगाव स्टेशन, पुढारी वृत्तसेवा :  श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कूल तळेगाव दाभाडे येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विन्सेंट सालेर यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, संचालक विलास काळोखे, शबनम खान,बाळासाहेब शिंदे, सचिन कोळवणकर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना दिली. वक्तृत्व, गीत गायन, देशभक्तीपर गीते, नाटक, कवायत आदी विद्यार्थ्यांनी सादर केले. सुरक्षा कटरे या विद्यार्थिनीने स्वातंत्र्यदिना बाबत मनोगत व्यक्त केले.

विन्सेंट सालेर यांनी चारित्र्यसंपन्न व चारित्र्यशील विद्यार्थी घडले पाहिजेत असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका शमशाद शेख, रेणू शर्मा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी नियोजन केले. सूत्रसंचालन धनश्री पाटील यांनी केले.

Back to top button