धक्‍कादायक : चोर आल्‍याच्‍या धास्‍तीतून भयग्रस्‍त तरुणाची आत्महत्या, बारामती तालुक्‍यातील घटना | पुढारी

धक्‍कादायक : चोर आल्‍याच्‍या धास्‍तीतून भयग्रस्‍त तरुणाची आत्महत्या, बारामती तालुक्‍यातील घटना

बारामती : पुढारी वृत्तसेवा : चोरांच्या धास्तीने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे शनिवारी (दि. १३) उघडकीस आली. अक्षय सुरेश कदम (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत तरुणाचा मावस भाऊ शेखर संजय शेलार (रा. पारगाव ता. दौंड ) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय मजुरीचे काम करत हाेता. गेल्या चार-पाच दिवसांमध्‍ये त्याला विचित्र स्वप्न पडत होती. शुक्रवारी (दि. १२) तो घरातील सदस्यांना सांगत होता की, चोर आले आहेत, मला मारणार आहेत. याबाबत त्याची घरातील लोकांनी समजूत काढली, आणि खोलीत झोपण्यास सांगितले. परंतु त्याच्या मनातून ही गोष्ट गेली नाही. घराची, दारे खिडक्या बंद करून घेतल्यानंतर त्याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.

शनिवारी सकाळी उशिरापर्यंत त्याने दार उघडले नाही. त्यामुळे कुटुंबियानी आत डोकावून पाहिले असता गळफास घेतल्याचे दिसून आले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा:  

Back to top button