पिंपरी : महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला | पुढारी

पिंपरी : महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला

पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री मोशी-आळंदी रोड, डुडूळगाव येथे घडली. याप्रकरणी महिलेने दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी रात्री भाजी आणण्यासाठी गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास बाहेर गेल्या. रस्त्याने जाताना त्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप पाहत होत्या. दरम्यान त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या हातातून 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button